Sunday, June 12, 2011

नवा दृष्टीकोन


आज सकाळी सकाळी घराच्या गच्चीवर मी गेले, नित्य सवईने झाडांना पाणी घालून झाल, फुल काढून झाली, पाणी घालताना त्यांच्याशी गप्पा मारून झाल्या, घराच्या समोरच्या ढोलीतील पोपट बघून झाले, कावळ्यांना उचकवून झालं, कबुतरांच निरीक्षण करून झालं, मांजरीला वेडावून झालं, बुलबुल, मैना, घारी, चिमणी, रॉबिन, सनबर्ड  साऱ्या साऱ्यांची हजेरी घेऊन झाली आणि आता मी खाली निघणार एवढ्यात वरच्या एका तारेवर बसलेला पक्षी मला खुणावू लागला. चकाकणारा निळा रंग जाड लांब अशी चोच आणि पांढरी छाती खुप मजा वाटली. अरे हा तर खंड्या! उदगार आपसूक बाहेर पडले. पाणवठ्याजवळ आढळणारा हा पक्षी आज इथली वाट कशी चुकला हे बघून आश्चर्य वाटल पण त्याच बरोबर आपण तयार केलेल्या छोटूशा कुटुंबात सर्वप्रथम आल्याबद्दल खुप कौतुकही केल. तो बिच्रारा काहीही न बोलता  गप गुमान बसला होता, वाट चुकला होता की काय माहित नाही पण तो आज इथे आला हेच खुप भारी वाटल. जरास गावाच्या बाहेर गेलं की हमखास सापडणारा हा खंड्या लांब लांब उडत इकडे कुठे बर आला असेल असा विचार करत मी खाली आले. 
दिवसभरात कामामध्ये गढून गेल्यावर मी हे साफ विसरूनच गेले, मात्र आत्ता हे सगळ झरझर डोळ्यासमोर आल आणि वेगळ्याच गोष्टीची जाणीव झाली. वास्तविक मी लहान असताना घरच्या देवाला फुल मिळावीत ह्या स्वार्थी हेतून झाडं लावली, एक एक करत ती वाढवली,  फुलवली, जपली. हा हा म्हणता गच्ची पन्नास एक झाडांनी भरून गेली.  हळू हळू वेगवेगळे पक्षी, फुलपाखर येऊ लागली बागेत मनसोक्त खेळू लागली आणि जीव आपोआपच रमत गेला. चिमणिनी आणलेल्या काड्या किवा बुलबुलाने कुंडीतल्या इवल्याश्या कढीलिंबाच्या झाडावर घेतलेले झोके सनबर्डनी अखंड केलेला फडफडाट मन भारावून टाकत राहिला. निसर्ग, पक्षी, फुलपाखर आजपर्यंत खुप लांब दूरवर गावाच्या बाहेर बघितली होती, ती आता माझ्या घराचा, कुटुंबाचा भाग होत आहेत हे बघून खुप समाधान वाटल. अस वाटल अरे हेच, हेच तर हव होत आपल्याला, सगळा निसर्ग आपल्या जवळ असावा, सगळ्यांनी आपल्याशी बोलाव, सगळ्यांना हे आपलच घर वाटावं, मनसोक्त खेळावं. एक पराकोटीच समाधान मिळाल. धन्य वाटल. 

तेजश्री 
(२०.०१.११ )

2 comments:

  1. तुझं पोस्ट आवडले तेजू.छान वर्णन केले आहेस, घराची गच्ची,खूप सारी फुलझाडे,त्यामुळे आलेला गच्चीला एक रंगीत ओलावा,पक्ष्यांची वर्दळ आणि खंड्याचे अचानक येणे...
    'गच्ची'हे तुझे लहानसे तू निर्माण केलेले निसर्गाच्या जवळ जायचे 'माध्यम'...फारच सुंदर कल्पना!
    'बाप्पाला व्हायला घरची फुले हवीत म्हणून झाडे लावलीस 'हा विचार मुळीच स्वार्थी नाही ग,उलट तुझ्या हातून २ पुण्यकर्म घडतात.एक बाप्पाची पूजा आणि एक वृक्षारोपण...
    दोन्ही कडून मनाला शांती आणि सुख प्राप्त होते.एखादा हिरवा अंकुर रुजला तर त्यातून अनेक अंकुर निर्माण करण्याचे काम आहे हे. तुझ्या लेखनातून तुझ्या गच्चीची एक सहल झाली बघ आज! असाच तुझे घर पण फिरून दाखव बरे पुढच्यावेळी.... :)

    ReplyDelete